Wednesday, October 5, 2016

मराठा क्रांती मोर्चा

मराठ्यांनी मराठ्यांच्या हितासाठी आपल्या बंधू मराठ्यांचा द्वेष न करता चालवलेले कार्य म्हणजे मराठा मोर्चा
आज मराठा लोकांनी आरक्षण चा मुद्धा मांडून जे समाजामध्ये तेढ निर्माण केली त्या ऐवजी उत्पनावर आधारित आरक्षण असा साधा मुद्धा मांडला असता तर जातीय वाद-विवाद झालाच नसता
ह्यात होतंय काय काही लोक मस्त पैकी जातीय भांडणाचा आस्वाद घेत बसतात. त्यांच्या मनातल्या गोष्टी मराठ्यांमार्फत सादर करतात.
अमराठी- मराठी मुद्धा वर भांडायचं मराठ्यांनी ,मराठा-obc मुद्धा वर भांडायचं मराठ्यांनी
आम्ही अजूनही लढवैये मावळे च आहोंत ओ
बर म्हंटल आम्ही आहोत मावळे पण आमचे राजे कुठयत?
वेळ अजूनही गेली नाहीय, मराठा एकत्र आले आहेत तर विधायक कार्य झालेच पाहिजे .आजपासून प्रत्येक मराठा आर्धिक दृष्ट्या दुर्बल  मराठा माणसाला शक्य तितकी मदत करणार  ,आपल्यापेक्षा कोण मराठा पुढे जात असेल तर त्याला मागे खेचण्यापेक्षा पुढे जाण्याची वाट दाखवनार
चूक आपली आहेच आणि ती सुधारायची आहे. आपली लोक एक असती तर मोर्चा ची गरज नसती . केलं असते आपल्या मराठा लोकांनी आपल्या लोकांच शिक्षण , लावले असते नॊकरीला
इथे आपणच आपले नाही आहोत,परक्याला काय बोला ?
असे निरीक्षण आहे ,मराठा माणूस परप्रांतीय  च्या दुकानात व्यवस्थित काम करेल पण मराठा माणसाच्या नाही .
मराठ्यांना आज माज कशाचा आहे? काय आहे तरी काय तुमच्यात?
पूर्वी होता समजू शकते ,जमिनी होत्या तुमच्या ,आता कांय ?तुमच्याच जमिनी विकून त्यावर काम करताय ना?
संपलं कि सगळं ,माज तेव्हडा राहिला
पूर्वी ची जमीन जुमला नाही राहिला तरी हि आज सिगारेट,दारू च्या जाहिरातीत तुम्ही झळकता कलाकार नवे..... नुसतं नाव "पाटील"
बाई वाड्यावर या गाण्याला तुम्हाला पाटील आजही लागतो ?
आणि बाकी पाटलांच्या गोष्टीच काय ?त्या गेल्या उडत ?
कुठे नेऊन ठेवलाय पाटील आमचा?का झाला भुईसपाट ?
पूर्वीचा मराठा आणि आजचा मराठा ह्याची तुलना करा
कुठे चुकलो स्वतःला कळेल आणि तेच बदलायचं आहे ह्यासाठी आहे 
हा मोर्चा 
मराठाच इतका सुधारावा कि देवांमध्ये सुद्धा स्पर्धा लागावी ,मराठ्यांचा देव मी होणार 
मराठ्यांनी क्रांती मोर्चा ला दारू सोडण्याची, माज सोडून कष्ट करण्याची आणि स्त्री ला देवीसमान मानण्याची शपथ घेतली तर ह्यापुढे मोर्चा ची गरज भासणार नाही . 
माझे कान  आसुसले आहेत ऐकायला जेंव्हा माझा मराठा माणूस म्हणेल ,
मी हि दारू सोडतोय ,तू हि सोड 
मी शेती सोडून व्यवसाय करतोय ,तू हि कर 
मी भावाभावातील संपत्तीं वरून चाललेला  वाद मिटवतोय,तू हि मिटवा
आणि ह्या चांगल्या कार्याची सुरवात म्हणून 
मी मोर्चा ला येतोय ,तू पण ये 
मूक मोर्चा ह्यासाठी कि प्रत्येक मराठाला प्रत्येक पावलात त्याच्या झालेल्या चुका आठवाव्यात 
आणि त्याचा विचार करून मोर्चा नंतर सकारात्मक बदल घडून यावेत. 

जय शिवाजी ! जय नवंमराठा!